सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

शाहू महाराजांची घसरगुंडी...???


विषय फारच गंभीर आहे...नाजूक आहे.. त्या मूळे लिखाण हे खूपच सय्यमाने करायला हवे...हृदयातले रक्त कितीही सळसळत असले तरीही खांद्यावरील मस्तक हे शांतच ठेवले पाहिजे.. अश्या बाबतींमध्ये निव्वळ रक्त सळसळून काही फरक पडत नाही तर अश्या लढाया वैचारिक सुधारणे मधूनच लढल्या गेल्या पाहिजेत...


 राजर्षी शाहू महाराज...खरच खूपच उदारमतवादी, लोभस, भारदस्त, सुधारणावादी, खऱ्या अर्थाने जाणता राजा...कारण त्यांना प्रजेबद्दल जाण होती..आपल्या प्रजेचे हित कशात आहे हे त्यांनी चांगलेच हेरले होते..त्या मूळे त्याकाळातच त्यांनी अनेक सुधारणावादी बाबींचा पाया रचला, शिक्षणाचा आग्रह धरला, अस्पृश्यतेचा तिटकारा केला...अश्या अनेक गोष्टी आहेत लिहिणाऱ्याची लेखणी संपेल, पण त्यांचे कार्य काय संपणार नाही...असा लोकप्रिय राजा..जीवापाड प्रेम बसावे असा नितीमत्त, वडीलधारी,प्रेरणादायक,आपलासा वाटणारा शाहू राजा...छत्रपती शिवरायांचा, शहाजी राज्यांचा, आई जिजाऊचां, शंभू राज्यांचा खरा वारसा पुढे चालू ठेवणारे असे अत्यंत आदरणीय राजर्षी शाहू महाराज...शाहू महाराजांच्या आयुष्यात बऱ्याच घटना ह्या आजच्या काळानुरूप विवादास्पद अश्या स्वरूपाच्या घडल्यात..त्यात मग...वेदोक्त प्रकरण असेल..टिळकांशी झालेली वैचारिक लढत असेल..कुलकर्णी वतनाच्या खालसेच्या वेळी झालेली टीका असेल..तर त्यांच्या वयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटना असतील..बऱ्याच गोष्टी आहेत..बऱ्याच बाबतीत शाहू महाराजां बद्दल समाजात अपसमज पसरले अथवा पसरवले गेलेत..

सर्वात मोठा क्लेश दायक असा घाव म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूंच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे..शिंतोडे नाही तर अख्खे शाहूंचे चारित्र्यच काही मंडळींनी चिखलात बरबटून काढण्याचा प्रयत्न केलाय.....

त्याच काळात टिळकांच्या चरित्रा वरही शिंतोडे उडवले गेले..ताई महाराज प्रकरणात टिळकांवर बलात्काराचे आरोप ठेवले गेलेत..पण त्यात षडयंत्र रचणारी टोळकी हि वेगळी होती त्या बद्दल स्वतः टिळकांनी त्याच वेळेस भाष्य केले होते..टिळकांच्या चारित्र्यावर तो एकदाच चिखल उडवला गेला.. पण शाहू महाराजांच्या चारित्र्यावर ब्रह्म वृन्दांनी वारं वार चिख्खल उडवलाय..हे सत्य आहे..विशेष म्हणजे..आज टिळकां वर झालेल्या तथाकथित बलात्काराच्या आरोपाची खमंग चर्चा अथवा त्या बाबत कुठल्याही स्वरूपाचे विकृत विनोद हे कुठल्याच समाजात केली जात नाही पण तेच शाहुंवरील आरोपांचे पर्यवसन हे आज जवळ पास सगळ्याच जातीच्या समाजा मध्ये काही विकृत विनोदाच्या स्वरुपात चर्चिले जातात...येवढा अन्याय कशा पायी...???
कित्येक वर्षे झालीत..टिळका वरील आरोप तोही एकच, शाहुंवरील आरोप ते अनेक.. दोन्हीही घटना एकाच काळात घडल्यात... पण आज फक्त शाहुंवरच विकृत स्वरुपात विनोद का केले जातात..ह्याचा विचार करायला भाग पडतो..शाहू महाराजांचे चरित्र अगदी..उन्हाळ्यातील भर दुपारी तळपणाऱ्या सूर्याच्या लख्ख प्रकाशा प्रमाणे तेजस्वी..आणि निष्कलंकित असतांना शाहू महाराजां वर असे विनोद कशापायी ???मूळ मुद्दा मराठ्यांच्या महापुरूषां बद्दलच असे विनोद का रचले जातात आणि ते अगदी चवीने का चर्चिले जातात ??? शंभू राज्यां बद्दलही तेच..शिवरायां बद्दलही तेच..मा जिजाऊन बद्दलही तेच...शहाजी राज्यांबद्दलही तेच..असे का??? असा काय गुन्हा केला होता मराठ्यांच्या ह्या महापुरुषांनी ??? महाराष्ट्राला..भारताला स्वराज्याचे स्वप्न दाखवले हीच काय ती चूक...महाराष्ट्राला सुधारणेची, समानतेची, प्रगतीची स्वप्ने दाखवली हीच काय ती चूक ??? खरंच कुठे काहीच अन्याय होत नाहीये का ??? कि मराठे ह्या अन्याया बद्दल एवढे एकरूप झालेत कि त्यांच्यातला मूळ लढवय्या स्वभाव कुठे हरवलाय..कि बहुतांशी बहुजन मराठ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची अजून जाणीवच नाही म्हणून ते अगदी "मोठे सावज" गिळून संथ झालेल्या अजगरा प्रमाणे मृतवत पडलेले आहेत..नेमके काय चालू आहे... आत्ता वेळ आलीय ती जागृती करण्याची...

थोडे मूळ विषयाकडे वळूयात..

शाहू महाराजां बद्दल आज ठिकठिकाणी "शाहू महाराजांची घसरगुंडी" ह्या शब्द प्रयोगाने काही विकृत कंबरे खालचे विनोद सगळी कडे कुजबुजले जातात...त्या त्या प्रदेशानुसार, व्यक्ती नुसार त्या विकृत विनोदाचे स्वरूप वेगवेगळे आहेत..पण एकूण सगळ्यात शाहू महाराजांची बदनामीच....शाहूंचे जातीय वंशज - म्हणजे मराठा मूले देखील हे विनोद चवीने चघळत असतात...काय हे दुर्दैव..त्या राज्याचे...त्यांचे म्हटल्या पेक्षा त्यांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या सर्वच मराठा, बहुजन लोकांचे..आपल्याच आई बापाची इज्जत स्वतःच्याच हाताने वेशीवर टांगल्या सारखे आहे हे सगळे...
अर्थात ह्या सर्वांना आपण आपल्याच आई बापाची इज्जत वेशिवर टांगतोय ह्याची कल्पनाही नसते..कारण काय.. तर आज वर असलेला ठराविक लोकांचा समाजावरील प्रभाव..आधुनिक आणि जुन्या प्रसार माध्यमा वरील त्यांची पकड..आणि तेवढ्याच प्रमाणात कारणीभूत असलेली मराठा बहुजन लोकां मधील अडाणीपण..बुद्धीवादी..आणि अभ्यासू विषयां मध्ये असलेली अरसिकता.. अभ्यास पूर्ण माहिती न घेता भावनिक होऊन विचार करण्याची प्रवृत्ती..आणि गाव गप्पां वर भोळ्या मनाने विश्वास ठेवणारा स्वभाव अशी अनेक कारणे त्यास कारणीभूत आहे.. आत्ता एकंदर ह्या सर्व प्रकारची ऐतिहासिक माहित बघुयात..
१) १९०१ च्या सुमारास, जेव्हा वेदोक्त प्रकरणाचा भडका उडाला असतांना कोल्हापुरातील "जिरगे" नावाच्या एका सधन कुटुंबातील रूपवान मुलीची आपल्या राजवाड्यात 'अब्रू लुटल्या' चा आरोप केला गेला.ह्या प्रकरणाचा महाराजांच्या हितशत्रूंनी इतका गवगवा केला की , त्या मुलीच्या पित्यास आत्महत्या करावी लागली. त्या मूळे तर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनून त्याचा नेमका फायदा उठवला गेला. त्या संबंधी शत्रूंकडून अतिरंजित कथा हेतुपुरस्कर पसरवल्या गेल्या. महाराजांचे चरित्र हनन करण्याचे एक जहरी हत्यारच त्यांच्या हाती आले. आरोप इतका गंभीर होता कि, शेवटी इंग्रज सरकारला ह्या प्रकरणाची चौकशी करावी लागली आणि या चौकशीत सरकारला हा , आरोप निराधार असल्याचे आढळून आले '
हे प्रकरण जेव्हा घडले असे सांगण्यात आले तेव्हा महाराज हे राजवाड्या वर न्हवतेच, ते कोल्हापूरच्या बाहेर असणाऱ्या सोनतळी (राजपुतवाडी ) कॅम्पवर होते. पण शत्रूंना त्याचे सोयरे-सूतक न्हवते. महाराजांचे राजवाड्यातील वास्तव्य गृहीत धरूनच त्यांनी त्या कथेचे षडयंत्र रचले होते - (संदर्भ १) राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - संपादक जयसिंग राव पवार. पान क्रमांक २४२ , मूळ संदर्भ - २) राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.,पृ.३५९-३६० ; ३) शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य.दि.फडके, पुणे १९८२, पृ.१४९; ४) Shahu Chhatrapati; A Royal Revolutionary - Dhananjay Keer, Bombay, 1976.page.162.)
२) यानंतर शाहू महाराजांच्या शत्रूंनी त्यांच्या वर १९०६ मध्ये दुसरा हल्ला केला. वेदोक्त प्रकरणात कोल्हापूरच्या ब्रह्मवृन्दांची झालेली अवमानास्पद हार, ब्राह्मण दहशदवाद्यांनी सुरु केलेल्या दहशदवादी कारवाया व त्या निपटून काढण्या साठी महाराजांनी अमलात आणलेली कठोर उपाय योजना अशी संमिश्र सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी या हल्ल्याच्या मागे होती. १९०६ च्या मध्ये वर महाराजांच्या कोल्हापुरातील शत्रूंनी 'शाहू महाराजांनी तीन स्त्रियांना जबरीने भ्रष्ट केले आहे ' अशा आरोपाच्या चौकशीची मागणी करणारी पत्रे मुंबई सरकार कडे पाठविली. त्यापैकी काही निनावी होती तर काही बनावट नावा खाली पाठविली होती. तसेच एक अर्जवजा पत्र कोल्हापुरातील ब्राह्मण-स्त्रियांच्या नावांनी कलकत्त्यास व्हाईसरायची पत्नी लेडी मिंटो यांना धाडले गेले होते.
हा सगळा उद्योग म्हणजे हिंदुस्थानातील एक संस्थानिक आपल्या संस्थानातील स्त्रियांची अब्रू धोक्यात आणत असून आता सार्वभौम सरकारनेच कठोर पावले उचलून (म्हणजे शाहू महाराजास पदच्युत करून) त्याचा बंदोबस्त करावा, म्हणून लेडी मिंटो यांची स्त्रीसुलभ सहानभूती मिळवण्याचा कुटील डाव होता, हे उघड होते. मुंबई सरकारच न्हवे तर व्हाईसरायच्या दरबार पर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने इंग्रज सरकारने त्याची दाखल घेऊन चौकशीची चक्रे सुरु केली. कोल्हापुरातील इंग्रज राजनैतिक प्रतिनिधी कर्नल फेरीस यांना चौकशीचे आदेश दिले गेले, कर्नल फेरीस यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांचा या आरोपावर खुलासा मागितला. या भेटी नंतर महाराजांनी त्यांना आपला लेखी खुलासा करणारे पत्र पाठविले.

प्रस्तुत पत्रात शाहू महाराजांनी आपली बाजू मांडत असतांना पुढील मुद्दे स्पष्ट केले १) जरी त्यांच्या शत्रूंची निनावी पत्रांनी आरोप केले असले तरी या आरोपांच्या तळाशी जाऊन चौकशी व्हावी. २) अशी चौकशी झाली म्हणजे 'अब्रू' जाईल अशी भीती त्यांना वाटत नाही . ३) विजापूरकर,राशिंगकर,टिळक आदी शत्रूच्या गोटातील मंडळींचे सहाय्य या चौकशी साठी घेण्यास आपली हरकत नाही; अशी चौकशी सरकार करणार नसेल तर सत्य शोधानासाठी त्यांच्याशी खाजगीत चौकशी करावी ४) ज्या तीन स्त्रियांच्या विषयी आरोप केला जातो, त्यांच्या पालकांना जाहीररीत्या अथवा खाजगीत या प्रकरणा विषयी विचारावे. ५) अशी चौकशी होत असता कोल्हापुरात आपली अनुपस्थिती आवश्यक आहे, असे टिळक व त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत असल्यास आपण त्यासही तयार आहोत ६) सर्व चौकशीनंतर आपणा वरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाल्यास आरोप करणाऱ्या टिळक पक्षीयांना योग्य ते शासन व्हावे ७) शेवटी, हेच प्रकरण न्हवे तर जन्मापासून आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्यात अशा स्वरूपाचे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडल्याचे या मंडळींनी सिद्ध करून दाखवावे, असे आपले त्यांना आव्हान आहे. 
                 शाहू महाराजांची सत्यावर श्रद्धा होती; म्हणून तीन स्त्रियांना भ्रष्ट केलेल्या आरोपाच्या जाहीर चौकशीस सामोरे जाण्याचे नैतिक धैर्य त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाले होते. महाराजां विरुद्ध आरोप करणारी पत्रे निनावी असल्याने जाहीर चौकशी करण्याचे इंग्रज सरकारलाही धारिष्ट्य झाले नाही. पण कोल्हापुरातील त्यांच्या राजनैतिक प्रतिनिधीस मात्र गुप्त चौकशी करून वर अहवाल पाठविण्यास सांगितले गेले.त्या प्रमाणे चौकशी झाली..व त्या चौकशी नंतर महाराजांचे चारित्र्य स्वच्छ असल्याचा व ते कधीच गैरव्यभिचारी जीवन न जगल्याचा अभिप्राय देणारा अहवाल प्रथम मुंबई सरकारकडे, तेथून व्हाईसराय कडे व त्यांच्या कडून इंग्लंड मधील भारतमंत्र्याकडे पाठविला गेला. सर्व भौम सरकारने तो ग्राह्य मानून पुढची चौकशी केली नाही.

३) दरम्यानच्या काळात टिळकांच्या पुढाकाराने कोल्हापुरात लोकप्रतिनिधी सभा अस्तित्वात आलेली होती. या सभेत बहुसंख्य ब्राह्मण असून प्रो. विजापूरकर, राशिंगकर, अळतेकर, अभ्यंकर, गोखले अशी मंडळी नेतेपदी होती. ऑक्टोबर १९०६ मध्ये या सभेची पहिली व शेवटची बैठक झाली. या बैठकीत एका नेत्याने उद्गार काढले कि, "कोल्हापुरातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपल्या वित्ताचे, जीविताचे किंवा नैसर्गिक हक्कांचे कसे संरक्षण होईल याची रात्र-दिवस काळजी पडली आहे " (संदर्भ - राजर्षी शाहू समरक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६ .) अशाच स्वरूपाचा प्रचार ब्राह्मणी वृत्तपत्रांतून होऊ लागला. शाहू महाराजांना महाराष्ट्रात बदनाम करण्याची हि पद्धतशीर मोहीम राबवली जात होती.
शाहू चरित्रकार कीरांनी म्हटले आहे , " ब्राह्मणी वर्तमान पत्रांनी , कोल्हापुरातील प्रत्येक पुरुष व स्त्री हि चिंताग्रस्त झालेली आहेत ह्या घोषणेचा प्रचार आणि प्रसार केला. कोल्हापुरातील ब्राह्मण व ब्राह्मणेतर स्त्रिया भयग्रस्त झाल्या होत्या, हे त्यांचे म्हणणे दुष्ट पणाचे व धादांत खोटे होते. ब्राह्मणेतर वर्ग ह्या शाहू विरोधी दुष्ट व चरीत्रहननाच्या चळवळी पासून अलिप्त राहिला होता. खरोखरच हि उघड उघड ब्राह्मणी चळवळ होती आणि त्या चळवळीचे लक्ष्य कोल्हापूर आणि कागल हेच होते. " (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६-१७७ )
४) १९१८ साली कोल्हापूर संस्थानातील कुलकर्ण्यांची वतने महाराजांनी खालसा केल्यावर तर टिळक पक्षीय व ब्राह्मणी वृत्तपत्रे यांच्या अंगाचा तिळपापड झाला. ब्रह्म वृन्दास तर महाराज म्हणजे आपले हाड वैरी वाटू लागले. त्यांच्या निषेध- सभांतून आणि वृत्तपत्रातून महाराज व त्यांच्या कुटुंबावर विखारी हल्ले होऊ लागले. खोट्या नाट्या कथा , कंड्या व अफवा अशा काही खुबीने अविरतपणे प्रसारित केल्या गेल्या कि , कोल्हापुरात कोणाचेही जीवित व अब्रू सुरक्षित नाही, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटावे.

५) १९२० च्या सुरवातीस मुंबई सरकारने कुलकर्ण्याचा अर्ज फेटाळून लावल्याने कुलकर्णी मंडळी संतापून गेली होती. या पार्श्वभूमीवर मे १९२० मध्ये संकेश्वर येथे कुलकर्ण्यांची दुसरी परिषद भरली असता बेळगावच्या दत्तोपंत बेळवी या टिळक पक्षीय पुढाऱ्याने पुढील आशयाचे उद्गार काढले :"कोल्हापुरात कोणाचीही बायको सुरक्षित नाही, कोणाचेही जीवित व मालमत्ता सुरक्षित नाही !" (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; जुन्या आठवणी - वा.रा. कोठारी, पुणे १९७३, पृ.६९. )
बेळवीनच्या या असभ्य वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर लोकांनी ठिकठिकाणी निषेध सभा भरवून केला. ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी टिळक पक्षीयाच्या बेजबाबदार हल्ल्यावर प्रतिहल्ले चढविले . एवढेच न्हवे तर मुंबईच्या 'इंदू प्रकाश' सारख्या नेमस्तवादी वृत्तपत्रानेही आपला निषेध नोंदवत असता म्हटले, " बेळवीनच्या ह्या कुत्सित्त भाषणा मूळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अत्यंत दुख व संताप येईल. आज पर्यंत पुष्कळांनी कोल्हापूरची निंदा केली, पण बेळवी इतका अविचारी हल्ला कोणीही केला नाही. बेळवी यांनी दरबारावर उडविलेले निंदा प्रचुर शिंतोडे हे ऐकीव माहितीवर आधारलेले आहेत. आणि अयोग्यच न्हवे तर दुष्टपणाने प्रेरित झालेले आहेत. त्यांनी सत्याचा अपलाप केला आहे. असे कोल्हापूर दरबारावर आरोप करून त्यांनी आपल्या स्वतःसच काळीमा लावला आहे. (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४३९.)
त्या वेळेस शाहूंनी राजनितीक प्रतिनिधी वूडहाऊन यांना आपल्या पत्रा द्वारे प्रतिक्रिया कळविली"मागास वर्गीयांची उन्नती करणे हा माझा उद्देश असल्या मूळे तसे करण्यात त्यांनी ब्राह्मणांचे अरेरावी जू जुगारून देऊन त्यांच्या मानसिक गुलामगिरीतून आणि सत्तेपासून मुक्त व्हावे हे माझे म्हणणे रास्त आहे. त्या मूळे माझ्यावर सुड उगविण्यासाठी आणि माझा लोकांनी खून करावा ह्या उद्देशाने दुष्ट पणाने माझ्यावर ब्राह्मण चळवळे हल्ला चढवत आहेत. माझ्या विरुद्ध लोकांच्या मनात द्वेष आणि संस्थानात अराजक निर्माण करण्याच्या हेतूने बेफाम भाषेत लिहित व बोलत आहेत " (संदर्भ - संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४४०.)

६) शाहू महाराज्यांच्या चरित्राच्या बदनामीचे पर्व त्यांच्या मृत्यूनंतरही थांबले नाही. बदनामीच्या कथा तिखटमीठ लावून त्यांच्या शत्रूंनी समाजात पसरवतच ठेवल्या. या मध्ये टिळक पक्षीय मंडळी पुढे होती.
(संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७)

अश्या प्रकारे शाहू महाराजां वर अनेक प्रकारचे वैचारिक दहशदवादाचे हल्ले त्या वेळेसच्या ब्राह्मणांनी केले होते...आरोप करूनही शाहू महाराज्यांचे स्वच्छ निर्मळ असे चरित्र काही कलंकित होतांना दिसत नसल्या कारणाने मृत्यू नंतरही तो प्रचार ह्या मंडळींनी चालूच ठेवला...व त्याचेच पर्यवसन आजच्या काळात "शाहू महाराजांच्या घसर गुंडी" च्या नावाने केले जाणारे विकृत विनोद होत..


तत्कालीन राजे महाराज्यां मध्ये बहु पत्नीत्व आणि पत्नी सोडून 'अंगवस्त्रे' ठेवण्याची रीत पूर्वापार पासून चालू होती त्या मूळे शाहू महाराजां वरील ह्या असल्या विकृत विनोदांना नंतरच्या काळात बरेच खत पाणी मिळाले...मराठा बहुजन लोकही काही अभ्यास न करताच राजे लोकांचा रंगेल मिजाज असायचाच अश्या अल्पज्ञानी आणि संकुचित अभ्यासाच्या दृष्टीकोनातून ह्या विकृत विनोदा वर संशयास्पद वातावरण साहजिकच निर्माण होऊ लागले ...त्या मूळे शाहू महाराजांच्या वयक्तिक खाजगी आयुष्य बद्दल थोडी माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल...
डॉ.य.दि.फडके प्रभृती चरित्रकारांनी आपल्या ग्रंथात महाराजांच्या काम जीवना विषयी चर्चा केलेली आहे आणि त्या सर्वांनीच त्या विषयावर वास्तव बोधी दृष्टी कोण मांडलेला आहे."तारुण्याच्या ऐन उंबरठ्या वर , वयाच्या अठराव्या वर्षी, राजवाड्यात शाहू महाराजांच्या १२ वर्षे वयाच्या राणीच्या 'गर्भादान विधी ' ची तयारी सुरु झाल्याची वार्ता गुरु फ्रेजर यांना समजताच त्यांनी आपल्या शिष्याला सावधानतेचा इशारा दिला आणि उभयंतांच्या भावी आयुष्याच्या भल्यासाठी व सुदृढ संततीसाठी त्यांनी राणीचे 'रास्त वय' होईपर्यंत तिच्याशी शय्यासोबत करू नये, असे बंधन घातल्याचा उल्लेख मागे येऊन गेलाच आहे. महाराजांनी हे बंधन पाळून आत्मसंयमनाचे प्रत्यंतर आणून दिले होते. विशेष म्हणजे त्या काळी त्यांच्या या आत्मसंयमनाचे व स्वयं-नकाराचे (सेल्फ - denial ) कौतुक संस्थानाच्या 'कौन्सिल ऑफ administration ' ने खास ठराव करून केले होते " (संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४८; राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.पृ.११३-११४ )
                      पुढे यथावकाश राज दांपत्यास चार अपत्ये झाली. बाळंतपणी अगोदरच नाजूक असलेल्या राणीसाहेबांची प्रकृती अधिकच नाजूक बनली. महाराजांना त्यांच्या पासून आवश्यक शरीर सुख मिळेनासे झाले. जवळच्या मंडळींच्या लक्षात हि गोष्ट येताच त्यांनी महाराजांना दुसऱ्या विवाहाचा आग्रह केला. पण अशा विवाहाने हेवेदावे व मत्सर उत्पन्न होऊन कुटुंब स्वस्थ कसे बिघडते, याची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने तो आग्रह त्यांनी मानला नाही. फ्यामिली डॉक्टर टेंगशे यांनीही राणीसाहेबाच्या प्रकृती स्वास्थासाठी महाराजांनी एखाद्या उपस्त्रीचा स्वीकार करावा म्हणून सुचना केली. राजपरीवारात या विषयाची चर्चा चालू असतानाच कोण तरी चांगल्या कुळाची गरीब घरातील एक कोवळ्या वयाची रूपवती मुलगी त्यांच्या समोर उपस्त्री म्हणून उभी केली. तिच्या वया कडे पाहून महाराजांचे मन द्रवले आणि तिचा स्वीकार न करता तिचे आपल्या एका तरुण अधिकाऱ्याशी लग्न लावून दिले (संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७३ ) 
                      पुढे आपल्या शरीर धर्माची गरज म्हणून महाराजांनी नर्तकी अथवा गायकी कुळातील प्रौढ स्त्रियांची उपस्त्री अथवा 'अंगवस्त्र' म्हणून निवड केली. महाराजांच्या आयुष्यात अशा ५/६ स्त्रिया एकामागून एक प्रमाणे येऊन गेल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. महाराजांच्या खाजगी जीवनाचा त्रोटक वृतांत नजरे खालून घातला तर कोणालाही महाराजां वर विषय लंपटत्वाचा आरोप करता येणार नाही. ज्या काळात हिंदी संस्थानिक शेकडो सुंदर सुंदर स्त्रियांचे जनानखाणे बाळगत होते; सरदार-दरखदारच न्हावे तर गावच्या देशमुख- पाटीला पर्यंतचे लोक लग्नाच्या २-४ बायका आणि आपल्या (आर्थिक) कुवती अनुसार अनेक अंगवस्त्रे बाळगत होते ( आणि असे कारणे प्रतिष्ठेचे मानले जात होते) त्या काळात शाहू महाराजांसारख्या संस्थानिकाने एकपत्नीत्वाचे पालन करून निसर्ग धर्मा साठी एखाद दुसऱ्या स्त्रीचा सहवास केला, तर त्या काळी ती नैतिक अधहपतनचि गोष्ट मानली जाण्याचे कारण न्हवते . पण शत्रूंनी या गोष्टीचा राईचा पर्वत केला, आणि बदनामीच्या अनेक कथा रचल्या.

प्रसिद्ध संशोधक व विचारवंत डॉ.य.दि.फडके यांनी महाराजांच्या चरित्रातील या विषयावर भाष्य केले आहे ते म्हणतात, " खरे म्हणजे एकापेक्षा अधिक स्त्रिया कडून शरीर सुख घेतल्या मूळे केवळ एखाद्याच्या मोठे पणाला उणेपणा येतो किंवा त्याचे कर्तुत्व डागाळते हा रूढ समाज मुळात चुकीचा आहे. इतिहास घडविणारे महापुरुषही अखेर हाडामासाची जिती जागती माणसेच असतात. प्रत्येक महान व्यक्ती साधू पुरुष असावी किंवा तिला विषय वासनेचे वावडे असावे हि अपेक्षा धरणे मुळातच चुकीचे आहे याचे भान अनेकांना राहत नाही. अशा परिस्थितीत भारतातील सत्ताधीशांच्या व अन्य कारणा मूळे लोकांना वंद्य वाटणाऱ्या व्यक्तींच्या लैंगिक जीवना विषयी खोटया नाट्या पण सुरस कथा त्यांचे शत्रू सांगत फिरतात. सर्व सामान्य माणसास वंद्य वाटणारी व्यक्ती लोकांच्या मनातून उतरावी यासाठी तिचे चरित्र हनन करण्याची चाल विरोधक नेहमीच खेळतात " (संदर्भ - शाहू छत्रपती आणि लोकमान्य - या.दि.फडके , पुणे, १९८२.पृ.१५०-१५१)


ह्या भाष्याच्या अनुरोधाने विचार करता शाहू महाराजांना बदनाम करण्या साठी त्यांच्या हित शत्रूंनी रचलेल्या सुरस कथा म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजास वंद्य असणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य हनन करण्याची तेढी चाल होती, असाच या विषयीचा अन्वयार्थ काढावा लागतो. आणि मग 'दिन दुनियेचा वाली' असणाऱ्या महाराजांच्या आकस्मित निधनाची वार्ता कानावर पडताच महाराष्ट्रातील बहुजन समाजात, सर्वत्र हाहाकार' उडून त्यांनी 'रक्ताची आसवे' गाळली, त्याच वार्तेने आनंदाने बेभान होऊन त्यांच्या हित शत्रूंनी मुंबई, वसई, सातारा आदी ठिकाणी रस्तोरस्ती पेढे वाढले, सत्य नारायणाच्या पूजा साजऱ्या केल्या आणि आपल्या मनातील जहरी भावनेस वाट मोकळी करून दिली. (संदर्भ - शाहू छत्रपती आणि लोकमान्य - या.दि.फडके , पुणे, १९८२.पृ.३००-३०१ ; विजयी मराठा १५ मे , २९ मे १९२२ रोजीचे अग्रलेख - श्रीपतराव शिंदे. )
================= 
एकंदर ऐतिहासिक माहिती हि राजर्षी शाहू स्मारक ग्रंथातून - राजर्षी शाहू छत्रपती ; जीवन व कार्य (खंड -१) ह्या जयसिंग राव पवार ह्यांनी लिहिलेल्या खंडातील ३१ वे प्रकरण "राजर्षी शाहू महाराज आणि त्यांची बदनामी करणाऱ्या शत्रूच्या कुटील कारवाया" पान क्रमांक २४१- २५० ह्यातून घेतलेली आहे..

=================
अश्या प्रकारे इतिहासाचा सखोल मागोवा घेतल्या नंतर आज जे शाहू राज्यां बद्दल विकृत विनोद शाहू महाराजांची घसरगुंडी च्या स्वरूपातून कुजबुजले जातात..त्या मागे नेमका कोणाचा व कसा हाथ आहे ते स्पष्ट झाल्या वाचून राहत नाही...ह्याचा अर्थ आत्ता ब्राह्मण समाजा बद्दल पेटून उठणे अथवा आत्ता ह्याचा बदला घेणे असा होत नाही..अथवा तसे काही करूही नये...हि एक प्रवृत्ती आहे आणि अश्या प्रवृत्तीचे माणसे हि त्यांच्या स्वकर्मानेच शिक्षा उपभोगतात...त्या मूळे बदल्याच्या भावनेने भडकून न जाता.. शांत चित्ताने ह्या सर्वावर विचार करावा.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आजू बाजूला जर कोणी अशी कुजबुज करत असतील तर त्या लोकांना ठणकावून सांगावे..हा सगळा इतिहास त्यांना समजावून सांगावा..आपलेच दात आणि आपलेच ओठ असा प्रकार झालाय...हे विनोद कुजबुज करणारीही आपलीच मंडळी आहेत..त्यांना सुधरवा...आपल्यातीलही काही जन हे विनोद कुजबुजत असतील..त्यांनीही ते थांबवावे... बहुसंख्य लोक ह्या बाबत जागृत झाले कि मग मोजक्या लोकांनी रचलेली कारस्थाने कधीच सफल होऊ शकणार नाहीत... १०० वर्षे झालीत तरीही राजर्षी शाहूंची बदनामी चालूच आहे... ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांनाच मुळात ते उमगत नाहीये..स्वतःवर स्वतःहूनच अन्याय करून घेणे चालू आहे...स्वताहून स्वतःच्या शरीराचा लचका तोडण्या सारखी कृती आहे हि..आपण सगळे शाहू रायाचे वंशज..आपल्याच पूर्वजाला आपणच बदनाम करतो...स्वतः विनोद कुजबुजत नसाल तरीही कुठे ते विनोद कानावर येऊनही जर तुम्ही त्यास प्रतिकार करत नसाल तर ते विनोद तुम्ही केल्या सारख्या समानच आहेत...
                                 खुद्द आंबेडकर वादी मंडळी शाहुंबद्दल ब्र देखील खपवून घेत नाहीत..पण तेच खुद्द शाहूंचे वंशज असलेले मराठे मात्र हे असले विनोद कुजबुजत असतात..त्यांना ह्याची जाणीवच नाही..निदान आंबेडकर वाद्यांना ह्या बाबतीत पूर्ण ज्ञान नसले तरीही ते थेट आमच्या महापुरुषां विरोधी आम्ही काहीच ऐकूनही घेणार नाही असा पवित्रा घेतात..पण तेच इतर बहुजन मात्र स्वतः कुजबुजण्यात धन्यता मानतात तर काही खी खी हसण्यात धन्यता मानतात, तर काही जन आपल्याला काय माहित नाही अश्या सबबी देण्यात धन्यता मानतात...माहित नसेल तर माहित करून घ्या...सतर्क राहा..असल्या विनोदांना आत्ता अग्नी द्या..
ह्या अनुषंगाने ब्राह्मणी प्रसार माध्यमांचा ब्राह्मणेतरा वर असलेल्या प्रभावाचेही दर्शन होते त्या काळात ब्राह्मणी प्रसार माध्यमांनी केलेल्या प्रसाराचा १०० वर्षा नंतर अजूनही प्रभाव ब्राह्मणेतरा वर तसाच आहे..आजही काही वेगळे घडत नाही...आजच्या प्रसार माध्यमाचाही तेवढाच प्रभाव सर्व सामान्यां वर पडतोय...रामदासांचे गुरु पद हाही त्याचाच एक भाग..दादोजींचे गुरु पद हेही त्याचेच उदाहरण..शंभू राजांची चुकीच्या पद्धतीने रंगवलेली रंगेल आणि रगेल अशी छबी..हि देखील त्याचीच परिणीती..काय माहित..आज जी इतिहासातील शिर्के, खोपडे , पिसाळ ह्यांच्या गद्दारीची जी उदाहरणे दिली जातात त्या मागेही असेच काहीसे राजकारण तर नाही न..प्रसार आणि सत्य ह्यात किती तफावत असू शकते ह्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे शंभू राज्यांची बदनामी, आणि शाहू महाराजांची बदनामी..त्या मूळे मित्रांनो वाचा...गैर समज दूर करून घ्या..आणि समाजात पसरत चाललेल्या चुकीच्या इतिहासाला आळा घाला...
             "मित्रांनो परत कोणी एक जेम्स लेन येईल ज्याच्या मूळे हा वाद चव्हाट्यावर येईल..आणि मग त्यानंतर आम्ही जागृत होउत..असे करू नका...कोणीतरी..दंगा घालेल...कुठली तरी संघटना ह्या बाबतीत आंदोलने करतील आणि त्या नंतरच आम्ही जागृत होउत..असे करू नका..निव्वळ कोणीतरी ते tv वर चर्चा सत्रे भरवलीत तरच आम्ही त्या बाबतीत जागृत होऊ असे करू नका.. जागे व्हा..शाहू हा आपला राजा आहे..त्या राज्याची बदनामी थांबवा..आजूबाजूला जर कोणी असले विनोद कुजबुजत असतील तर सर्व ऐतिहासिक मुद्द्यां निशी त्या त्या पोरांचे मत परिवर्तन करा..जोर जबरीने.दादागिरीने..तात्पुरते कुजबुजने थांबवता येते.. पण जर हा प्रकार मुळापासून उपटून काढायचा असेल..तर त्या बाबतीत समाजात योग्य पद्धतीने माहिती पसरवायला हवी तेव्हाच  ते तसले विकृत विनोद कायमचे कुजबुजणे बंद होतील..त्या मूळे हे सगळे प्रकरण सखोल पणे माहिती करून घ्या..थोडवेळ काढा चार पुस्तके वाचा..योग्य ती माहिती संबंधित इतिहास तज्ञाकडून मिळवा..एकंदर सखोल अशी माहिती मिळवा आणि मग ती तुमच्या मित्रा पर्यंतही पोहचवा..ज्याने करून ह्या बाबतीत समाजात प्रबोधन / जागृती  निर्माण होईल..आणि हे असले विकृत प्रकार संपूर्णपणे थांबतील...
     मी माझ्या परीने ह्या प्रकरणाची थोडक्यात माहिती देण्याचे प्रयत्न केलेले आहेत..उत्सुकांनी संदर्भासाठी दिलेले पुस्तके सखोल माहिती साठी वाचावीत..वा अजूनही इतर कोणी ह्या बाबत लिखाण केले असेल तर ते लिखाणही वाचावे..पण ह्या असल्या बाबींकडे दुर्लक्ष करू नये..जागृत रहावे.."

 .



३४ टिप्पण्या:

  1. अतिशय नाजुक विषयवार संदर्भ सहित लिखाण ....
    समाजात असणारी विनोदी संभाषाने बंद होण्यास नक्की मदत होईल..

    उत्तर द्याहटवा
  2. छान माहिती..बरोबर संदर्भ दिल्यामुळे मुद्द्यांना खुप बळकटी येतिये...आणि नवीन पिढी महापुरुषांबाबत खुप positive आहे..कितीही चिखलफेक करायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडनार नाहीं.

    उत्तर द्याहटवा
  3. सर्व प्रथम अत्यंत अभ्यासपूर्ण आणि गंभीर माहिती आपण दिली यासाठी मन:पूर्वक आभार . ही माहिती आणि दृष्टीकोन हजारो लोकापर्यंत जाण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागेल . असे लक्षात येते की जातीयवादी लोक आणि त्यांचे नेटवर्क सतत कार्यरत असते . एकाच नव्हे अनेक विषयावर एकाच वेळी त्यांचे काम सुरु असते . त्याविरुद्ध ज्यांना काम करायचे आहे ते सगळे फक्त प्रतिक्रिया आणि खुलासे देत राहतात . त्यामधून नवीन काय घडू शकते याचाही विचार व्हावा . आजच्या काळास अनुसरून आपली सामाजिक वर्तणूक काय असावी हे सुद्धा ठरवणे आवश्यक आहे . महापुरुषांचा विचार आणि अभिमान जातीच्या नावाने बाळगल्यास शेवटी काय तर जातीयवादी शक्तीच विजयी होत राहणार . जात आणि जातीयता दोन्ही नष्ट करावे लागेल . तरच महापुरुष सन्मानीत आणि प्रेरक ठरतील .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. माहीतीचा बद्दल धन्यवाद.अशा अफवा पसरल्याने कुचाळकी करणारे असतात

      हटवा
    2. माहीतीचा बद्दल धन्यवाद.अशा अफवा पसरल्याने कुचाळकी करणारे असतात

      हटवा
  4. आपण सदर विषय उत्तम हाताळलाय …मी कोल्हापूरचा आहे अन पुण्यामध्ये नोकरीस आहे.. इतके दिवस इथल्या लोकांच्या या प्रश्नांना कस उत्तर देऊ समजत न्हवत.. लोक थट्टा करायचेत … कोल्हापूरकर म्हंटल कि हमखास हा विषय छेडला जायचा … यावर मी शाहुमहाराजांच्या अनेक चांगल्या कामाचे दाखले लोकांना द्यायचो …पण त्यांच्या चेष्टेला योग्य उत्तर न्हवत सापडत…. आता देतो संदर्भा सहित स्पष्टीकरण

    उत्तर द्याहटवा
  5. Thank you for valuable information. Lot of my friends told me this joke but from childhood I didn't believed on them. I was not having any evidence to tell truth about such nonsense jokes, now atleast I can explain good things about our great King. Jay shahu maharaj, Jay Maharashtra

    उत्तर द्याहटवा
  6. शाहू राजा हा ग्रेट राजा होता,सलाम त्यांच्या कार्याला ........

    उत्तर द्याहटवा
  7. काल बाजीराव मस्तानी चित्रपटाबद्दल what's app वर मित्रांची चर्चा चालू होती, त्यातील एका मित्राने पुढील पोस्ट टाकली "पेशवाईमुळे छत्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न पुढे कमीत कमी २००-२२५ वर्ष टिकले घसरगुंडीच्या राजकारणान १० वर्ष्यात स्वराज्य गुंडाळून ठेवले असते" हे मित्र अमेरिका स्थित आहेत, त्यांना त्यांच्या चुकीचे अनेक संदर्भ दिले, तर त्यांनी मला जातीवादी म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार आजही चालू आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पेशवाई मुळे नाही टिकले
      फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलेल्या निष्ठेमुळे टिकले

      हटवा
    2. ते मित्र कसे असू शकतात??

      हटवा
  8. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. धन्यवाद,सर सत्य संशोधात्मक माहिती दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो.
    खरं पहिले तर बहुजन तरुणांना खूप अभ्यासाची गरज आहे.बहुजन महामनवांच्या च चरित्र्यावर शिंतोडे का उडले गलेत ? या गोष्टीचा सखोल अभ्यास बहुजन तरुणांना करून येण्याऱ्या पिढीला सत्य दाखवून दिले पाहिजे..

    उत्तर द्याहटवा
  11. धन्यवाद,सर सत्य संशोधात्मक माहिती दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो.
    खरं पहिले तर बहुजन तरुणांना खूप अभ्यासाची गरज आहे.बहुजन महामनवांच्या च चरित्र्यावर शिंतोडे का उडले गलेत ? या गोष्टीचा सखोल अभ्यास बहुजन तरुणांना करून येण्याऱ्या पिढीला सत्य दाखवून दिले पाहिजे..

    उत्तर द्याहटवा
  12. बहुजन समाजाने जागृत झाले पाहिजे..संग्रही ठेवण्यासारखा लेख...धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  13. बहुजन समाजाने जागृत झाले पाहिजे..संग्रही ठेवण्यासारखा लेख...धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  14. माझ्याही डोक्यात राजश्री शाहूंची बदनामी करणाऱ्या ह्या अश्लील विनोदावर लिहायचे होते.ह्यामागे ब्राम्हणी षड्यंत्र कार्यरत होते व आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्याला कारण म्हणजे शाहू महाराज हे सत्यशोधक चळवळीचे अनुयायी होते. त्यात वेदोक्त प्रकरणामुळे हि बदनामी मुद्दाम केली जात असणार ह्याविषयी मी पण ठाम आहे. तुम्ही संदर्भासह सखोल लेखन केल्याबद्दल अभिनंदन..

    उत्तर द्याहटवा
  15. उत्तम लेख. अभ्यासपूर्ण मांडणी. विवेक आणि चौकस बुद्धी जागृत ठेवण्यास प्रवृत्त करणारा आहे. आभार...

    उत्तर द्याहटवा
  16. धन्यवाद,सर सत्य संशोधात्मक माहिती दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो.

    उत्तर द्याहटवा
  17. मी कोल्हापूर। चा असून आणि आज मला जास्त च राजश्री शाहु महाराज यांचा अभिमान वाटत आहे

    उत्तर द्याहटवा
  18. मी कोल्हापूरचा असून मला शाहू महाराजांच्या बद्दल खूप आदर आहे,नव्हे ते माझे प्रेरणास्थान आहेत,त्यांनी केलेल्या कार्यामुळेच आज कोल्हापूर इतके सुजलाम सुफलाम आहे, मी स्वतः ब्राम्हण आहे,पण राज्याबद्दल होणाऱ्या असल्या खोट्या बदनामी मुले प्रचंड राग येतो, तुमच्या या लेखामुळे सत्य सर्वांसमोर येण्यास खूप मदत होईल,, धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  19. Very informative article. There are some think tanks still working against the great leaders of Bahujan samaj. We will have to expose them. But before that We have to educate our people's.
    My salute to author who wrote the article.
    With regards.

    उत्तर द्याहटवा
  20. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांची अलिखित बदनामी करण्याचे षड्यंत्र तद्दन ब्राम्हणी (इथे याचा अर्थ कोणती जात नसून विशिष्ठ वृत्ती असा घ्यावा ) कर्मठ लोकांनी केलेलं आहे तरीही बहुजन समाजातील माथेफिरू आणि अर्धवट लोक त्याचं अफवांना मोठ्या चवीने पसरवताना दिसतात


    तो काळ वेगळा होता आता आम्ही लिहिते झालोय

    मी सर्व कोल्हापूर व महाराष्ट्रातील जनतेला आज आव्हान करू इच्छितो कि जर कोणी तुमच्या समोर आपल्या कोल्हापूर गादीचा म्हणजेच या दोन महापुरुषांचा अपमान भले विनोदातून करू पहिला तर सणसणीत कानाखाली वाजवा ...

    माज उतरत नसेल तर नुसती हाक द्या आमची पायताणे नाल मारून घेऊन येऊ

    #कोल्हापुरी #शाहूमहाराजकीजय

    उत्तर द्याहटवा
  21. छ.शाहू एक महान राजा. उत्तम लेख, अत्यंत आवश्यक लेख. मी तर अनेक ठिकाणी याच प्रमाणे छत्रपतींवरच्या आरोपांचे खंडन केले आहे.या लेखाने माझ्अया पिढील भाषणांना अधीक बळकटी येईल धन्यवाद.मी बौद्ध आहे. आणि बाबासाहेब, फुले महात्मा आणि छ.शाहू राजे छ.शिवबा यांची बदनामी सहनच करु शकत नाही.

    उत्तर द्याहटवा
  22. Dhanyvad sir
    Jar koni tudmhachy samor assa vinod kela tar kana khali hana tyala

    उत्तर द्याहटवा
  23. आम्ही तरी कधीही शाहू महाराजांविषयी असे काही ऐकले/वाचले नाही.... एक समाजसुधारक राजा म्हणूनच शाहू महाराजांची ओळख आहे...

    उत्तर द्याहटवा
  24. दिलीप नाईकवाडे, नाशिक१९ एप्रिल, २०२० रोजी १:५९ PM

    खूप चांगली माहिती मिळाली आहे.महाराजांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खूप मोलाचे कार्य केलेले आहे.

    उत्तर द्याहटवा
  25. ब्रामण मुळे सर्वाना नेहमी त्रास झाला त्या वेळी

    उत्तर द्याहटवा